औरंगाबाद- किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील रोख रकमेसह विक्रीसाठी ठेवलेले तेल, तूप आणि साबणही लंपास केल्याची घटना शनिवारी (ता.१७) पहाटे तुर्काबाद खराडी येथे घडली. खाद्यपदार्थ चोरी होण्याची वर्षभरातील ही पहिलीच घटना असावी.
मोहन बालचंद सोनवणे वय ४१ यांची गावात ओम साई नावाने किराणा दुकान आहे.
चोरट्यांनी
पहाटे दुकानाचे शटर उघडून दुकाना मधील तेलाचे व तुपाचे डबे,
साबण,
रोख रक्कम असा
सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी
वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील
तपास सहायक फौजदार साठे हे करीत आहेत.
दुष्काळाच्या झळा मराठवाड्याला जाणवू लागल्या
आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. सोने आणि
पैशांवर डल्ला मारणाऱ्या चोरांनी आता खाद्य पदार्थ ही सोडले नाहीत असेच या घटनेतून
जाणवते आहे.












