सानिया - शोएबच्या घरी आनंदाची बातमी, मुलाचे नाव ठेवले मिर्झा मलिक

Foto

सांजवार्ता ऑनलाईन


भारताची प्रसिद्ध टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घरी एका लहान पाहुण्याचे आगमन झाले आहे. शोएबने ही गोड बातमी ट्विटरद्वारे त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. सानियाने मंगळवारी पहाटे एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएब यांनी हैदराबादमध्ये निकाह केला होता. लग्नाच्या आठ वर्षानंतर त्यांच्या घरात पाळणा हलला आहे.

शोएब मलिकने मंगळवारी सकाळी ट्विटकरुन मुलगा झाल्याची गोड बातमी दिली. ट्विटमध्ये म्हटले आहे, कळवण्यास फार आनंद होत आहे. मुलगा झाला आहे. माझी पत्नी सानियाची प्रकृती चांगली असून नेहमी प्रमाणे ती स्ट्रॉंग आहे. सानिया – शोएबने मुलाचे नाव मिर्झा मलिक ठेवले आहे.

सानियाने एका मुलाखतीत सांगितले होते की आमच्या मुलाच्या नावात आमच्या दोघांचे नाव असेल. आमच्या दोघांच्या नावाने त्याला ओळखले जाईल, असे त्याचे नाव असेल. त्यानुसार मिर्झा मलिक असे बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे.

सानिया आणि शोएब यांनी २०१० मध्ये हैदराबाद येथे पारंपरिक मुस्लिम पद्धतीने विवाह केला होता. लग्नानंतर सानिया टेनिस खेळणार का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. त्याचे उत्तर तिच्या खेळानेच दिले.

सानियाला २००४ मध्ये अर्जुन आणि २००६ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.