औरंगाबाद - वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन रशिद यांची एआयएमआयएममधून सोमवारी सायंकाळी हकालपट्टी करण्यात आली. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयोजित मनपाच्या सर्वसाधारण बैठकीसाठी आलेल्या मतीन यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले.
महापौरांच्या
आदेशाने काढले बाहेर
ऑल इंडिया मजलीस
इत्तेहाद ऊल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन रशिद यांची
सोमवारी सायंकाळी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशाने पक्षातून
हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयोजित मनपाच्या सर्वसाधारण
सभेसाठी मतिन उपस्थित झाले आणि सभागृहात येऊन बसले होते. भाजप नगरसेवकांनी त्यांना
सभागृहातून बाहेर काढण्याची मागणी केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या
अधिकारांचा वापर करत मतीन यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि तेही शांतपणे सभागृहाच्या
बाहेर पडले.
हेही वाचा - वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन यांची एआयएमआयएममधून हकालपट्टी
मनपात मंगळवारी
आयोजित सर्वसाधारण सभेत मराठा आरक्षण देणाऱ्या शासनाचा व विविध राज्यात निवडणुकीत
आघाडीवर असलेल्या पक्षांच्या अभिनंदनाचा ठरावावर चर्चा करण्यात आली. याचवेळी मतीन
सभागृहात दाखल झाले. ते बाकावर बसल्याबरोबर भाजप नगरसेवक राजगौरव वानखेडे, प्रमोद राठोड
यांनी महापौर घोडेले यांना मतीन यांच्या उपस्थितीबद्दल माहिती करून देत त्यांना बाहेर
काढण्याची मागणी केली. महापौर मतीन यांना बाहेर काढणार नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने
बाहेर काढू असा इशारा नगरसेवकांनी दिला. महापौर घोडेले यांनी त्यांच्या अधिकाराचा
वापर करीत मतीन यांना बाहेर जाण्यास सांगितले. यावर मतीन शांतपणे सरळ सभागृहाबाहेर
पडले. या प्रकाराबाबत माध्यमांशी संवाद साधताना मतीन यांनी आपण आपला हक्क
बाजावण्या करीता आलो होता. उपस्थिती संबंधी रजिस्टरवर सही सुद्धा केली आहे. काही
भाजपा नगरसेवकांनी माझ्या उपस्थिला विरोध दर्शविला. बहुतांश विषय बैठकीत मांडायचे
होते ते राहून गेले असे सांगत त्याने मनपातून काढता पाय घेतला.










