हिंदुत्वादी शिवसेनेची अन्य धर्मियांची मनधरणी, या आमदाराने दिला चर्च साठी ५० लाखाचा निधी

Foto

जालना- राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून जालना येथील क्राईस्ट कॅथ्रेडल  चर्च साठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सतत हिंदुत्वाच्या मुद्यावर आग्रही असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांनी अन्य धर्मियांची मनधरणी सुरु केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा ३१ डिसेंबरच्या रात्री मार्केट सुरु ठेवण्याची मागणी असो किंवा मग सोमवारी दि. ७ रोजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी क्राईस्ट कॅथ्रेडल चर्च च्या विकासाठी दिलेला ५० लाख रुपयांचा निधी असेल. यावरून शिवसेना सध्या अन्य धर्मियांची सध्या मनधरणी सुरु केली आहे असे दिसून येते. जालना येथील क्राईस्ट कॅथ्रेडल चर्च हे जिल्ह्यातील हजारो ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान असून शहरातील ख्रस्ती धर्मीय लोक या चर्च मध्ये मोठ्या प्रमाणात प्रार्थनेसाठी येत असतात त्यामुळे अन्य धर्मीय लोकांना येणाऱ्या लोकसभा आणि विधानभा  निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आकर्षित करण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे देखील हिंदुत्वादी संघटनांच्या लोकांकडून खाजगीत बोलले जात आहे.