मुंबई- येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना नक्की काय करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. युतीसाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी विधानसभेसह लोकसभा निवडणुकीसाठी समसमान म्हणजे, अनुक्रमे १४४ आणि २४ जागांची मागणी शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता पक्षातील ज्येष्ठ नेते बोलून दाखवत आहेत.
विधानसभेला वेगळी
निवडणूक लढवूनही गेली साडेचार वर्षे शिवसेना भाजपसोबत सरकारमध्ये आहे. मात्र, भाजप सरकारवर
टीकेची एकही संधी शिवसेना सोडत नाही. अशा वेळी शिवसेना निवडणूक युती करून लढवणार की, स्वतंत्रपणे
लढणार याबाबत राजकीय क्षेत्रात विविध तर्क लढविले जात आहेत. हा निर्णय सर्वस्वी
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अवलंबून असल्याने पक्षातील ज्येष्ठ नेतेही
याबाबत निश्चित सांगू शकत नाहीत. मात्र, मंत्रिमंडळात दुय्यम दर्जाची पदे देणे, वारंवार राजकीयदृष्ट्या
हिणवले जाणे, अगदी
कालपरवापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे उद्धव ठाकरे यांना
निमंत्रण न देणे या सगळ्या अपमानांचा बदला शिवसेना व्याजासकट नक्कीच वसूल करणार, असे सेनेतील नेते
छातीठोकपणे सांगत आहेत.
विधानसभेला
भाजपच्या १२३ आणि शिवसेनेच्या
६३ जागा निवडून
आल्या होत्या. तरीही सेना निम्म्या जागांची मागणी करणार हे आता जवळपास नक्की आहे.
मात्र, लोकसभेच्या
जागावाटपात पहिल्यापासूनच भाजप जास्त जागा लढवत आला आहे. अगदी प्रमोद महाजन
यांच्या काळापासून विधानसभेसाठी सेनेला जास्त जागा सोडल्या जात असत आणि लोकसभेला
भाजप अधिकच्या जागा पदरात पाडून घेत असे. यंदा या दोन्ही ठिकाणी समसमान म्हणजे १४४ व २४ असे समीकरण
भाजपला मान्य करावे लागणार आहे.
भाजपचे केंद्रीय
नेतृत्व दबावाखाली
राजस्थान, मध्य प्रदेश व
छत्तीसगड या तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपचे केंद्रातील दोन्ही ज्येष्ठ नेतेही
प्रचंड दबावाखाली आले आहेत. बिहारमध्ये त्यांनी नितीशकुमार व रामविलास पासवान
यांची ज्या प्रकारे मनधरणी केली आहे ते पाहता शिवसेनेसारख्या ताकदवान पक्षाच्या
दबावापुढे तर त्यांना झुकावेच लागेल, असे सेनेतील अनुभवी नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे
लोकसभेलाही शिवसेनेला अधिकच्या जागा मिळू शकतात. अर्थात, याबाबत अंतिम
निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्याच हाती असल्याने ते कोणत्या वेळी कोणता बाण चालवतात
ते पाहावे लागेल, असेही सेना नेत्यांचे म्हणणे आहे.
जागांचे वाटप
मीडियाने केले- राऊत
भाजपशी युती
करण्यासाठी शिवसेना समान जागांची मागणी करणार असल्याचे वृत्त शिवसेना नेते खा.संजय
राऊत यांनी आज फेटाळून लावले. शिवसेना-भाजपमध्ये अर्ध्या-अर्ध्या जागांचे वाटप
मीडियाने केलेले आहे. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने किंवा मुखपत्रातून आम्ही तसे
काहीही जाहीर केलेले नाही,फ असे खा.राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पंढरपूर दौर्यावर जाणार आहेत. तिथे चंद्रभागेच्या
तिरी उद्धव महाआरती करणार असून, शिवसेनेची जाहीर सभाही होणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा
निवडणुकांच्या दृष्टीने यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा होणार असल्याची चर्चा आहे.
विशेषत: शिवसेना-भाजपची युती होणार की नाही, याबाबत भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. त्या
पार्श्वभूमीवर जागावाटपाचे फॉर्म्युलेही समोर आले आहेत. संजय राऊत यांनी मात्र हे
सगळे फॉर्म्युले फेटाळून लावले.