बिल्डरला ३३ लाखांना गंडवणाऱ्या आरोपींना अटक

Foto

औरंगाबाद अतिरिक्त पोलिस आयुक्तचित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी ओळख करुन देत भंपकबाजी केलेल्या दिल्लीमुंबईतील भामट्यांनी हज कमिटीच्या चेअरमन पदाचे आमिष दाखवून बेगमपु-यातील बांधकाम व्यवसायिक आरेफोद्दीन सिद्दीकी नुरद्दीन सिद्दीकी (४३ यांना ३३ लाखांना गंडवले होते. या प्रकरणातील दोघांना पोलिसांना अटक केली आहे.

लेद राहगीब (रा. नवी दिल्ली), त्यासह परवेज आलम (रा. शाहीन बागओकलानवी दिल्ली),  आणि आबुसाद (रा. मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.

हज कमिटीच्या चेअरमनपदाचे आमिष दाखवून गंडवले होते


आपली महाराष्ट्र सरकारमध्ये चांगली ओळख आहे, त्यामुळे तूम्ही सहजपणे हज कमिटीचे चेअरमन होवू शकता असे आमिष दाखवत ३३ लाखांची मागणी आरोपीने केली होती. त्याप्रमाणे आरेफोद्दीन यांनी पैसे दिले. मात्र पूर्ण पैसे देऊनही नियुक्ती पत्र देण्यास टाळाटाळ होत होती. त्यामुळे फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याबरोबर आरेफोद्दीन यांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठत तक्रार दिली होती.

पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकरदत्तु गायकवाड यांनी ही कारवाई केली.