उद्धव ठाकरे अयोध्येत, औरंगाबादमध्ये चौका-चौकात प्रभू श्रीरामाची महाआरती

Foto
 औरंगाबाद- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज ( शनिवार )  अयोध्येत पोहचले आहेत. राम जन्मभूमी आणि साधुसंतांचे ते दर्शन घेणार आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांतर्फे श्रीरामाची महाआरती करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुखानी दिलेले आहेत. त्यानुसार औरंगाबाद मध्ये प्रत्येक चौकात  प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली. शहरातील गुलमंडीत महापौर नंदकुमार घोडेले आणि प्रदीप जैस्वाल व शिवसैनिकांनी महाआरती केली तर  टीव्ही सेंटर चौकातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रभू श्रीरामांचा फोटो ठेवून शिवसैनिकांनी महाआरती केली. उस्मानपुरा भागातील राम मंदिरातही महाआरती करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, अनिल पोलकर, सीमा खरात, नगरसेविका स्वाती नागरे आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.