उदयनराजे महाराष्ट्र क्रांती सेना पक्षातर्फे निवडणूक लढवणार?

Foto

कोल्हापूर- आगामी लोकसभा निवडणूक खासदार उदयनराजे भोसले यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली नाही, तर त्यांनी आमच्या पक्षातून निवडणूक लढवावी अशी ऑफर त्यांना क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सोमवारी (ता.१९) कोल्हापुरात दिली.

 

मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर उदयास आलेला महाराष्ट्र क्रांती सेना हा नवा राजकीय पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत सर्व जागा लढवणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सोमवारी (ता.१९) कोल्हापुरात ही माहिती दिली