मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यासाठी, अमेरिकेकडून ३५ कोटींचे बक्षीस

Foto

वॉशिंग्टन- मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्‍लेखोरांची माहिती देणार्‍यास ३५ कोटींचे बक्षीस अमेरिकेने जाहीर केले आहे. या हल्ल्यातील दोषींविरोधात कठोर कारवाई करा, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. 

 

संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज दहा वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यामध्ये ३४४ परदेशी नागरिकांसह १६६ नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे ७०० जण जखमी झाले होते. या हल्ल्यात अमेरिकेच्या सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी आज या हल्ल्यातील शहिदांना अमेरिकेच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. पोम्पिओ म्हणाले, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही यातील दोषींवर कारवाई न होणे हा पीडितांचा अपमान आहे. संयुक्‍त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे सूत्रधार हाफिज सईद आणि जकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे हे पाकिस्तानची जबाबदारी आहे. पाकिस्तानने ङ्गलष्कर-ए-तोयबाफसारख्या दहशतवादी संघटनांविरोधात कडक पावले उचलण्याची गरज आहे. या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार हाफिज सईद व जकीउर रहमान लखवी यांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून ती ५० लाख डॉलर अर्थात ३५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.