औरंगाबाद- मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेल्या १६ टक्के आरक्षणाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात जयश्री पाटील यांच्या वतीने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारी (ता.३) दाखल केली होती. घटनेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. राज्य सरकारने दिलेले आरक्षण हे घटनाबाह्य आहे असा दावा सदावर्ते यांनी केला आहे. सदावर्तेंच्या या दाव्याला मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून उत्तर दिलेले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अॅड. सदावर्तेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
काय
आहे विनोद पाटलांची फेसबुक पोस्ट
मराठा
आरक्षण विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ५०% मर्यादा संदर्भात याचिका दाखल करण्यात
आलेली आहे. याच उच्च न्यायालयाने अगोदरच ५२ % व मुस्लिम समाजाच ५%
आरक्षण मान्य केलेल आहे, अर्थातच
५०% ची मर्यादा तिथेच संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे सदावर्ते यांची जी मागणी आहे
ती पहिल्या दिवसातच संपून जाईल.
सदावर्ते
साहेब जे मला बोलत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुमच्यासारखे १०,००० वकील दररोज मुंबईत फिरतात, तुमचा
नंबर १०,००१वा
आहे. मराठा समाजाने आरक्षणाबाबतची काळजी घेऊ नये, हा तुमचा मराठा सेवक आरक्षणा साठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल व आरक्षण
टिकवणारच.










